Latest Bollywood News Update | पाली सोबतचा ह्या अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल | Lokmat Marathi News

2021-09-13 8

नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव असणारी अभिनेत्री राधिकाने नुकताच पालीसोबतच आपला एक फोटो पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे राधिकाने हातावर किंवा भिंतीवरच्या पालीचा फोटो पोस्ट केला नसून स्वत:च्या चेहऱ्यावर असणाऱ्या पालीचा फोटो शेअर केला आहे. चेहऱ्यावर पाल असून देखील तिने दिलेली प्रतिक्रिया हटके अंदाजमध्येच दिसून येत आहे. या फोटोला कॅप्शन देताना ‘पडद्याच्या मागे…’ असे लिहिले आहे. कदाचित तिचा हा फोटो पाहून पॅडमॅन चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यानचा असण्याची शक्यता आहे.आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राधिकाच्या चेहऱ्यावर असणारी ही पाल खरी आहे की खोटी ? परंतु जर तुम्ही नीट पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की, तिच्या चेहऱ्यावर असणारी ही पाल खरी नसून खेळण्यातील आहे.‘पॅडमॅन’ चित्रपटात राधिका अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires